⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनात वाढ ; आता मिळणार एवढा पगार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२४ । आपले सरकार सेवा केंद्र संबंधित ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकरने आपले सरकार सेवा केंद्र संबंधित ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकां मानधनात ३ हजार वाढ केली असून आता त्यांना १० हजार मानधन मिळणार आहे.

राज्य मंत्रीमंडळाने 16 मार्च 2024 रोजी घेतलेल्या बैठकीत संगणक परिचालकांच्या मानधनात 3000 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता परंतु प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.

यातच ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांबाबत सीएससी-एसपीव्ही या कंपनीची अनिमित सेवा व तक्रारी वाढल्या होत्या. याबाबत आता ग्रामविकास विभागाने या कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ कंपनीमार्फत करण्यात येईल.त्याचप्रमाणे आपले सरकार केंद्र संगणक परिचालकांचे मानधनात १० हजार रुपयापर्यंत केलं आहे.