⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न होणार पूर्ण, शासन निर्णय जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । राज्यातील पोलिस दलासाठी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला होता. राज्यातील हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. तशी माहिती गृहमंत्र्यालयाकडून देण्यात आलीय.

मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं पोलिसांच्या पदोन्नतीबाबत महत्वाचा निर्णय घेतला होता. मात्र, आज त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. पदोन्नतीचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलिस शिपाई, हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांना होणार आहे. यामुळे पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. शिवाय पोलिस दलास सद्यःस्थितीत प्रत्यक्ष कामकाजासाठी मिळणाऱ्या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होईल.

या निर्णयामुळे पोलिस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवाकालावधीत पदोन्नतीच्या तीन संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली.

शिपाई, हवालदार, उपनिरीक्षकांची पदे वाढणार
याशिवाय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदोन्नती साखळी मधील पोलीस नाईक या संवर्गातील 38 हजार 169 पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे. यामुळे आता पुनर्रचनेनंतर पोलिस शिपायांची पदे 1 लाख 8 हजार 58, पोलिस हवालदारांची पदे 51 हजार 210, सहायक पोलिस उपनिरीक्षकांची पदे 17 हजार 71 वाढतील.

हे देखील वाचा :