⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Maharashtra Floor Test : बहुमत चाचणी होणारच, उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । उद्या बहुमत चाचणी होणारच असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. उद्या ११-५ दरम्यान हि चाचणी घेण्याचा निकाल देण्यात आला आहे. यामुळे शिंदे गटाचा विजय झाला आहे. (Maharashtra Floor Test)

महाराष्ट्रात ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार की नाही याचा फैसला आज घेण्यात आला. तब्बल साडेतीन तास तिन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला फैसला सुनावला. यावेळी बहुमत चाचणी होणारच असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाकडे महाविकास आघाडी, शिंदे समर्थक बंडखोर आमदार, भाजपा. महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगितलं. यावर आक्षेप म्हणून महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र बहुमत चाचणी होणारच असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. (Maharashtra Floor Test)

शिवसेनेचे वकील अभिषेक मनू संघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. संघवी यांनी दोनदा युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर अक्षेप घेतला राज्यपाल कोरोना मुक्त झाल्यावर लगेच विरोधी पक्षांना कसे भेटले? त्यांनी एवढी घाई का केली? असा प्रश्न यावेळी संघवी यांनी विचारला. तर दुसरीकडे नबल रेबिया यांनी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयात दाखवत. सरकारच बहुमत सोडा, शिवसेना पक्षालाच बहुमत नाही. हा मुद्दा गैरलागू ठरतो यासाठी बहुमताची चाचणी व्हावी असा युक्तिवाद शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी केला. (Maharashtra Floor Test)

याचबरोबर जर बहुमताची चाचणी घेतली नाही तर, लोकशाहीला धक्का बसेल. घोडेबाजाराला वर नियंत्रण ठेवता येणार नाही. असे देखील कौल म्हणाले. बहुमत सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्ष कोर्टात येण चुकीच असून लोकशाहीत बहुमत सिद्ध करण्यासाठी विधिमंडळ पेक्षा दुसरी कोणती जागा आहे का? असाही प्रश्न यांनी विचारला. यावर निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. उद्या बहुमत चाचणी होणारच असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. (Maharashtra Floor Test)