प्रवाशांनो लक्ष द्या! सोमवारी महाराष्ट्र एक्स्प्रेस‎ ‘या’ स्टेशनपर्यंतच धावेल, तिकीट काढण्याआधी जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२३ । भारतीय रेल्वेने दररोज करोडो प्रवाशी यात्रा करतात. मात्र अनेकवेळा तांत्रिक‎ कामे रेल्वे एकतर रद्द केल्या जातात नाहीय मार्गात बदल केला जातो. जर तुम्हीही येत्या सोमवारी २७ फेब्रुवारीला‎ महाराष्ट्र एक्स्प्रेसचे तिकीट करणार असाल तर ही बातमी आधी वाचा..

कारण पुणे विभागात रेल्वेची विविध कामे‎ हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे घेतलेल्या‎ ब्लाॅकमुळे गोंदिया-कोल्हापूर‎ महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ फेब्रुवारीला‎ गाेंदिया येथून सुटून केवळ‎ पुण्यापर्यंत धावेल. ही गाडी पुढे‎ काेल्हापूरपर्यंत जाणार नाही. तर २८‎ फेब्रुवारीला ही गाडी कोल्हापूर‎ ऐवजी पुणे येथून सुटेल. सातारा-‎ काेरेगाव स्थानकादरम्यान तांत्रिक‎ कामे सुरू आहेत.

यामुळे गाडी‎ क्रमांक ११०४० व ११०३९ महाराष्ट्र‎ एक्स्प्रेस काेल्हापूर-पुणे-काेल्हापूर‎ स्टेशन दरम्यान रद्द केली आहे. रेल्वे‎ प्रशासनाने कळवल्यानुसार गाडी‎ क्रं.११०४० गाेंदिया-काेल्हापूर‎ महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ फेब्रुवारीला‎ गोंदियाहून निघेल. पण, ती थेट‎ कोल्हापूरपर्यंत न जाता पुण्यापर्यंत‎ धावेल, असे कळवण्यात आले.‎