जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२३ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वी परीक्षेच्या निकालाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
काही दिवसापूर्वी महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यानंतर आता दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. आता प्रतीक्षा संपुष्ठात येणार असून बोर्डाचा दहावीचा निकाल येत्या काही दिवसातच जाहीर होण्याची शक्यता आहे.
फक्त 10वी पासकरीत 12828 पदांसाठी मेगाभरती
मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल येत्या आठवड्यतच जारी केला जाईल असं समजत. दरम्यान, ”जळगाव लाईव्ह न्यूज” या वेबसाइटवर तुम्हाला यासंदर्भातील प्रत्येक अपडेट पाहता येणार आहे.
दहावीचा निकाल तुम्हाला महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन चेक करता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.