मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

10वी पास उमेदवारांना थेट केंद्रीय नोकरीची संधी.. तब्बल 12,828 जागांवर मेगाभरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. जर तुम्हीही दहावी पास झाले असाल तर तुमच्यासाठी आताच नोकरी मिळविण्याची एक मोठी संधी आहे.

भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भारतीद्वारे तब्बल 12828 पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यानुसार अर्ज करू इच्छिणारे उमेदवार इंडिया पोस्टच्या indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. India Post Recruitment 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023  16 ते 23 जून 2023 आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, अर्जाच्या अटी, वेतनश्रेणी इत्यादींबद्दल तपशीलवार माहितीसाठी भरती जाहिरात तपासण्याचा सल्ला दिला जातो. India Post GDS Bharti 2023

रिक्त पदाचे नाव :
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता:
अर्जदाराकडे माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता 10) उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराने राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून गणित आणि इंग्रजी विषयांसह 10वी किंवा हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून त्याची समकक्ष पात्रता.

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे.

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेतील उमेदवारांची निवड त्यांना मॅट्रिक परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांच्या आधारे केली जाईल.

अर्ज फी:
उमेदवारांना संबंधित विभागाच्या नावावर अर्ज फी म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील. एससी, एसटी, महिला उमेदवार आणि अपंगांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023  16 ते 23 जून 2023
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 12 ते 14 जून  24 ते 26 जून 2023

भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online