12वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार , निकाल कुठे व कसा पाहाल?

मे 1, 2026 10:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२६ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल उद्या, शनिवार, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

hsc result

जळगाव विभागासह राज्याचे लक्ष
जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची धाकधूक आता वाढली आहे. राज्य मंडळाने अधिकृत घोषणा केल्यामुळे निकालाबाबतच्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. जळगाव विभागातही निकालाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

निकाल कुठे व कसा पाहाल?
विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजेपासून खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल:
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in

दरम्यान, विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी आपला ‘सीट नंबर’ (Seat Number) आणि ‘आईचे नाव’ (Mother’s Name) ही टाकून निकाल पाहता येणार आहे.

पत्रकार परिषदेत होणार सविस्तर घोषणा
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकालाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात अधिकृत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत राज्याचा एकूण निकाल, मुला-मुलींच्या निकालाची टक्केवारी आणि विभागवार आकडेवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now