---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; २० नोव्हेंबरला मतदान होणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२४ । संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असून यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

vidhansabha 1

त्यानुसार महाराष्ट्रात २० तारखेला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.

---Advertisement---

निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे.सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे.

महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.यात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी इतकी आहे. तर ४.६६ कोटी या महिला मतदार आहेत. यात २०.९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम कसा असणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही २२ ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार २९ ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर ३०ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर ४ नोव्हेंबर २०२४ ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---