जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबईतील आगामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी होणारी संभाव्य प्रचंड गर्दी लक्षात घेता भुसावळ विभागातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानिक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. भुसावळ विभागातील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित असेल.
या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी?
त्यामध्ये बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असेल. प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरज असलेल्या प्रवाशांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.