ग्रॅज्युएट्स पाससाठी खुशखबर.. महाराष्ट्र वन विभागात बंपर भरती, 92,300 पगार मिळेल

Mahaforest Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवी पास उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र वन विभागमध्ये लेखापाल (गट क) पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होईल.

रिक्त पदसंख्या : 127

भरले जाणारे पद :
ही भरती लेखापाल (गट क) या पदांसाठी होणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे. अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ – 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]
इतका पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 29,000/- रुपये ते 92,300/- रुपये पर्यंत पगार दिला जाईल. तसेच अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते मिळेल

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा