जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । एकीकडे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यातच दुसरीकडे केंद्राने सर्वसामान्यांना झटका देणारा निर्णय घेतलाय. तो म्हणजे केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत.

सरकारने १४ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ केली आहे. यानंतर, उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलेंडरची किंमत ५०३ रुपयांवरून ५५३ रुपये होईल. तर घरगुती गॅस सिलिंडर ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये होईल.
पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती
माध्यमांशी बोलताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढत आहेत आणि येथील किमती कमी होत आहेत. यामुळे सरकारने एलपीजीच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत आम्ही त्याचा आढावा घेऊ असे ते म्हणाले.
१ ऑगस्ट २०२४ पासून किमती स्थिर होत्या..
गेल्या काही महिन्यांत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झाला असला तरी, १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या जळगावात एलपीजी सिलिंडरची किंमत ८०८ रुपये आहे. या दरवाढीनंतर आता ८५८ रुपये मोजावे लागणार आहे