जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी बांधव यामुळे हवालदिल झाले असून अचानक होत असलेल्या पावसामुळे त्यांची दाणादाण उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे मका भुईसपाट झाला. याचबरोबर केळीच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. अशावेळी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले.
रावेर परिसरासह खानापूर, अजनाड या पट्ट्यात सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली, यामुळे खानापूर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, मका या पिकाचे या ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.