
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२१ । जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांनी शहरासह आता ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील रामदास धना पाटील (वय-८२) या शेतकऱ्याच्या घरात चोरी झालीय. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपये अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत असे की, मुंदखेडा येथील रामदास पाटील या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली. त्यातून ३ लाख ९ हजार सातशे रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. दरम्यान १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रामदास धना पाटील हे परिवारासह तांदुळवाडी ता. भडगाव येथे गेले. ते १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घराचा पाठीमागील दरवाजा अर्धा उघडा दिसून आला. त्यावर रामदास पाटील यांनी घरातील गोजरेज कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड ३ लाख ४९ हजार असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपये अज्ञाताने चोरून नेल्याचे दिसून आले.

गुन्हा दाखल
या घटनेने रामदास पाटील यांच्यावर डोंगरच कोसळले आहेत. वर्षभर शेतात राबराब राबून घामातून कमविलेले उत्पन्न एका क्षणात अज्ञाताने डल्ला मारला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान रामदास पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम-३८०, ४५४ व ४५७ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.
हे देखील वाचा :
- संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर नात्यातील नराधमाचा अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती
- एरंडोलमधील ३ कुख्यात गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून तडीपार
- सालदाराकडून वृद्ध मालकिणीचा बेल्टने गळा आवळून खून ; रावेरातील घटनेने खळबळ
- तरसोद-पाळधी बायपासवर पुन्हा भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू
- मावशीच्या घरावरच भाच्याचा डल्ला! रावेरातील घरफोडीचा छडा; दोघे जेरबंद




