---Advertisement---
जळगाव जिल्हा पाचोरा

भरधाव वाळूचे ट्रॅक्टर उलटले; चालक जागीच ठार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । आंबेवडगाव ( ता. पाचोरा ) येथील तरुण चालकाचा वाळूचे ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याच्या चाकाखाली दबून मृत्यू झाला. ही घटना २३ रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. आकाश शांताराम सोनवणे (वय २४,) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

mrutu 1 jpg webp

सविस्तर असे की, चालक आकाश साेनवणे हा गिरणा नदी पात्रातून वाळू घेऊन येत असताना ट्रॅक्टर भरधाव वेगात हाेते. पाचोरा शहरातील भडगाव रेल्वे उड्डाण पुलाजवळ वाळू भरलेले हे ट्रॅक्टर अचानक पलटी झाले. या अपघातात चालक साेनवणे चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, या घटनेविषयी ट्रॅक्टर मालक पवन विजय वाघ यांनी पोलिसांत तक्रार दिली. आकाश हा २३ रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास वाळू घेऊन आंबेवडगावला जात हाेता. रेल्वे उड्डाणपुलावर ही घटना घडली.

---Advertisement---

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. आंबेवडगावात या घटनेने शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---