उच्चशिक्षित तरुणाची गळफास घेत आत्महत्या

ऑगस्ट 29, 2021 11:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

llb student jalgaon city suicide jpg webp

सिंधी कॉलनी परिसरात रोहन इंदरलाल मेहता वय-२४ हा तरुण परिवारासह राहतो. रोहनचे एलएलबीचे शिक्षण झाले असून कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने तो मुंबई येथून जळगावी परतला होता. जळगावात कुटुंबीयांनी त्याला बळीराम पेठेत साड्यांचे दुकान टाकून दिले होते. रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे उठला, वृत्तपत्र वाचन करून पुन्हा बसला.

कुटुंबीय घराबाहेर गेलेले असताना त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहनची आई सुनीता ८ वाजून १० मिनिटांनी घरी परतल्यावर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. रोहनच्या पश्चात वडील, आई आणि एक १ मोठा भाऊ असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now