⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

जळगावच्या साहित्यिक डॉ. प्रियंका सोनी “प्रीत ” राष्ट्रीय साहित्य सौरभ पुरस्काराने सन्मानित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । शहरातील रहिवासी तथा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय साहित्यकार डॉ.प्रियंका सोनी “प्रीत” यांना 6 रोजी पवित्र तीर्थ क्षेत्र मेवाड राजस्थान येथे आयोजित साहित्य संमेलनात ‘राष्ट्रीय साहित्य सौरभ’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम तीन दिवसीय होता. संमेलनाचे आयोजन नाथद्वारा येथील “साहित्य मंडळ संस्था नाथद्वारा” संस्थेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. या संस्थेची स्थापना भारताच्या स्वतंत्रता पूर्वी म्हणजे ८५ वर्षापूर्वी या संस्थेचे संस्थापक माननीय स्वर्गीय भागवती प्रसाद देवपुरा यांच्याद्वारे स्थापित करण्यात आली होती. स्वर्गीय भगवती प्रसाद देवपुराजी देश आणि विदेशात प्रसिद्ध हिंदी साहित्यकार होते. यांच्या स्मरणार्थ या साहित्य संमेलनाच्या आयोजन दर वर्षी साजरा केला जातो.

या संमेलनात देशाच्या किमान 150 साहित्यकार यांच्या सहभाग होता. ह्या कार्यक्रमात डॉ. प्रियंका सोनी “प्रीत ” यांना त्यांच्या रचना धर्मिता व उत्कृष्ट लेखना बाबत ह्या पुरस्कार देण्यात आला.

हे देखील वाचा :