⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

गुड न्यूज : आता घरबसल्याच मिळणार हयातीचा दाखला

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । पेन्शनधारकांना शासनाने उपलब्ध केलेल्या सुविधेनुसार दिलासा मिळायला लागला आहे. केंद्रीय मंत्रालयाने त्यांना नवी सुविधा दिली आहे. पेन्शनधारकाला हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. सेवानिवृत्त आणि वृद्ध नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारने चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणले. पेन्शनधारकांसाठी ही प्रणाली सुरु करण्यात आलीय. त्यामुळे आता घरबसल्याच दाखला मिळणार हयातीचा आहे.

प्रत्येक जीवन प्रमाणचा (डीएलसी) युनिक आयडी असतो ज्यास प्रमाण – आयडी म्हणून ओळखले जाते. हयातीचा दाखला सादर करण्याआधी पेन्शनधारक जिवंत आहे हे सुनिश्चित करावे लागते. पेन्शनधारक हयात असून त्याला मिळणारा लाभ यापुढेही सुरु राहावा यासाठी हयातीचा दाखला मिळवणे आवश्यक ठरते.

केंद्र सरकारचे जीवन प्रमाण’ अॅप डाऊनलोड करा आणि नोंदणीकृत व्हा. तसेच मोबाईलद्वारे घरी बसून चेहरा प्रमाणीकरणाद्वारे हयातीचा दाखला काढता येणार आहे.

पेन्शनधारकाचा आधार क्रमांक, नाव, बँक खात्याचा क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर माहिती हाताशी लागणार आहे. अॅपवर ही माहिती भरल्यावरच पुढची प्रक्रिया सुरळीत होईल. त्यामुळे अचूक माहिती हाताशी असणे आवश्यक आहे.