LIC च्या या योजनेद्वारे महिलांना दरमहा 7000 कमवण्याची संधी; अर्ज कसा कराल?

जून 23, 2025 10:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२५ । केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या सर्व योजनांचा उद्देष हाच आहे की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. यातच सरकारी विमा कंपनी एलआयसीनेही नवीन योजना सुरु केली आहे.

Bima Sakhi Yojana

घरून काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी, भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने विमा सखी योजना सुरु केलीय. केंद्र सरकार आणि LIC च्या संयुक्त उपक्रमांतर्गत, महिलांना या योजनेत LIC एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान, ₹५,००० ते ₹७,००० पर्यंतचे वेतन दिले जाते आणि यशस्वी प्रशिक्षणानंतर, महिला त्यांच्या क्षेत्रात LIC एजंट म्हणून काम करू शकतात. दरवर्षी एक लाख विमा सखी तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

विमा सखी योजना म्हणजे काय?
विमा सखी योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे. या अंतर्गत निवडक महिलांना विमा, आर्थिक साक्षरता, ग्राहक व्यवहार आणि पॉलिसी विक्रीशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, महिलांना विमा सखी प्रमाणपत्र आणि LIC एजंट कोड जारी केला जातो.

किती स्टायपेंड मिळेल?
प्रशिक्षणादरम्यान, महिलांना दरमहा ५,००० ते ७,००० पर्यंत स्टायपेंड दिले जाते. प्रशिक्षणानंतर, जर एखादी महिला सक्रिय एलआयसी एजंट बनली तर तिला कमिशन आणि प्रोत्साहन स्वरूपात कमाईच्या संधी मिळतात. या योजनेअंतर्गत, महिला एजंट पहिल्या वर्षीच ४८,००० पर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकते. जर एखाद्या महिलेला तीन वर्षे स्टायपेंड मिळत राहायचे असेल, तर अट अशी असेल की पहिल्या वर्षाच्या ६५% पॉलिसी पुढील वर्षी देखील सक्रिय राहतील.

कोण अर्ज करू शकते?
फक्त महिला अर्ज करू शकतात
वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असावे
किमान पात्रता १० वी उत्तीर्ण
विद्यमान एलआयसी एजंट, कर्मचारी किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक या योजनेसाठी पात्र नाहीत.

अर्ज कुठे करावा?
तुम्हाला एलआयसीच्या या योजनेसठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. याचसोबत तुम्ही CSC पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories

Leave a Comment