लेवा पाटीदार समाज युवक-युवती परिचय मेळावा २ जानेवारी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, बहिणाबाई ब्रिगेड आणि लेवा सखी घे भरारी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक,युवतींचा परिचय मेळावा रविवार, दि. २ जानेवारी सकाळी ११ वाजता लेवा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कुटुंब नायक रमेश पाटील हे असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ खडसे, डॉ. उल्हास पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, रोहिणी खडसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, सुनील महाजन, आशा कोल्हे, ललित कोल्हे, ऍड. प्रकाश पाटील यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहतील.
संमेलन मेळाव्याच्या या नियोजनासाठी नुकतीच बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी प्रकाश पाटील व प्रदीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक