⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शिवसैनिकाने लिहिले रक्ताने पत्र : उद्धव ठाकरे यांना दर्शवले समर्थन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । राज्यात शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. तर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी सेनेलाच आवाहन दिले आहे. यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आता भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी रक्ताने पत्र लिहीत आपल समर्थन दिल आहे. (ShivSainik in Bhadagaon)

आताची शिवसेना ही खरी नसून आसाममध्ये एकत्र आलेल्या आमदारांची सेना हीच खरी शिवसेना आहे. असे बंडखोरांचे म्हणणे आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आणि सेनेच्या कृतीवर चालते अस शिंदे यांनी म्हटलं. सेनेच्या चाळीस पेक्षा जास्त आमदारांनी सत्येविरोधात बंड पुकारल्यामुळे राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तर शिंदे यांच्या नेतृत्वात बहुतांश आमदार आसाम राज्यातील वगुवाहाटी येथे मुक्कामी असल्याने शिवसेने सोबतच महाविकास आघाडीचे भवितव्य देखील संकटात आहे

फुटणारी सेना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहोत मात्र सगळ्यांनी परत या अशी भावनिक साद घातली. त्यानंतर राज्यात शिवसेनेची खरी ताकद असाणारा सामान्य शिवसैनिक हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. तर जळगावात शिवसैनिकांनी आपले प्रेम आणि सेनेप्रति असणारी निष्ठा दाखवून दिली.

राज्यात शिंदे यांनी शिवसेनेला भगदाड पाडत शिवसेनाच आपल्याबरोबर असल्याचे दाखवून दिले आहे. तर आता सेना नाही तर शिंदे असेल असेच चित्र निर्माण केलं आहे. त्यानंतर राज्यातील शिवसैनिक चांगलेच गोंधळले आहेत. कारण राज्यात शिंदे यांना मानणारा गट ही आहे. त्यामुले शिवसेना ही फुटू नये म्हणून सामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. जळगावात ही शिवसैनिक रस्त्यावर उतरून ठाकरे यांना समर्थन देत आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून थेट रक्ताने पत्र लिहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवली आहेत.