⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

प्रचंड ताकदीने पुन्हा विधानसभेत भगवा फडकवू – आदित्य ठाकरे

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । महाराष्ट्रात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार आहे, प्रचंड ताकदीनं शिवसेना विधानसभेत पुन्हा दिमाखात भगवा फडकावले असा आत्मविश्वास आदित्य ठाकरे यांनी यक्त केला. यावेळी ते म्हणाले कि, या सरकार बाबद कोर्टात लढाई सुरु आहे, आमचा व्हीप हाच खरा आहे. हे आम्ही कोर्टात सिद्ध करु.

जे पळाले, त्यांना शिवसेना संपवायची होती, अशी जोरदार टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेनंतर मी गेलो होतो रात्री अडीच वाजता, पण तिथले स्थानिक आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते, असं सांगत यानिमित्ताने त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. मतदारांना बंडखोर आमदारांना कधी तरी तोंड द्यावं लागेलच, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला आहे. जे बंडखोर आमदार आपल्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हते, ते मतदारसंघात मतादारांना कसे सामोरे जाणार, असा सवाल काल आदित्य ठाकरेंनीच उपस्थित केला होता. त्याचाच धागा पकडत मतदारसंघात काय कराल असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

20 मे रोजी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं होतं, त्यावेळी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय का, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली होती. असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ती ऑफर नाकारली होती, असेही यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ज्यांचा जन्म आमचा पक्ष पोखरण्यासाठीच झाला आहे, ते दुसरीकडे जाऊनही तेच करतील, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.