⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | लिंबू महागला, अमळनेरात १६० रुपये किलो

लिंबू महागला, अमळनेरात १६० रुपये किलो

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । उन्हाळ्याची सुरवात झाली असून रसदार लिंबूला मागणी वाढली आहे. मात्र, उत्पादन कमी अन् मागणी जास्त असल्याने दरवाढ झाली आहे. सध्या अमळनेर शहरातील बाजारात लिंबू १६० रुपये किलोने विक्री होत आहे. दरम्यान, आगामी काळात तापमान वाढल्यास भाजीपाल्याचे दरही वाढू शकतात.

या खालोखाल हिरवी मिरची कडाडली आहे. हिरव्या मिरचीला ६० रुपये, कांदा १० ते १५, टमाटे २०, तर काटेरी वांगे ४० रुपये किलो आहेत. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, ज्या ठिकाणी लिंबू उत्पादक शेतकरी १०० गोनी लिंबूचा मला घ्यायचा त्याच ठिकाणी आता ४ ते ५ गोनी माल निघत आहे. तसेच इंधन दरवाढ याचा देखील फटका व्यापाऱ्यांना व किरकोळ विक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळेच लिंबूचे भाव १६० रुपये पार गेल्याचे येथील लिंबूचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.

तीव्र उन्हाच्या झळांचा फटका लिंबांना बसला

थंडीत मोठ्या प्रमाणावर धुके पडल्याने फळधारणेवर परिणाम झाला. उन्हाळ्यात लिंबूच्या लागवडीस भरपूर पाणी लागते भरपूर पाणी उपलब्ध झाले तर लागवडही चांगली होते. मात्र, तीव्र उन्हाच्या झळांचा फटका लिंबांना बसला. तसेच मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ५०० झाडांच्या बागेत फक्त ४ ते ५ गोणी माल लिंबू निघत आहे. त्यामुळे यंदा लिंबूची विक्रमी वाढ झाल्याचे लिंबूचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह