⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

कायदेविषयक शिबीर : एरंडोलला विधी सेवा समितीचे सचिव न्यायाधीश शेख यांनी केले पक्षकारांना मार्गदर्शन!

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । एरंडोल येथील तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यामानाने १० रोजी कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. यावेळी जळगांव विधी सेवा समितीचे सचिव न्यायाधीश ए.ए.के.शेख यांनी पक्षकारांना दि.१३ रोजी होणारे लोकन्यायालयाबाबत मार्गदर्शन केले.

एरंडोल न्यायालयाचे न्यायाधीश भक्ती ए.तळेकर व सह.दिवाणी न्यायाधीश विशाल श्रावण धोंडगे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍड.एम.ओ.काबरे, सचिव ऍड. ज्ञानेश्वर बळीराम महाजन, ऍड.सी.आर.बिलो, ऍड.एम.एम.महाजन, ऍड.एच.बी.पाटील, ऍड.सुजीत पाठक हे होते, कार्यक्रमास सुत्रसंचालन ऍड. ज्ञानेश्वर बळीराम महाजन यांनी केले. कार्यक्रमास पक्षकार व इतर विधीज्ञ, सहा. अधिक्षक मुकूंदे नाना, विधी सेवा समितीचे बेडीसकर व इतर कार्यालयीन कर्मचारी शिपाई, संदिप हरणे व अडवाणी उपस्थित होते.