⁠ 
सोमवार, जून 17, 2024

विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावणारा भामटा एलसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । तालुक्यातील ममुराबाद येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढल्याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने एकाला अटक केली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा विक्की उर्फ माया गणेश शिंदे याच्या साथीने चोरला असल्याचे सांगितल्यावरून शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली आहे.

ममुराबाद येथील विद्यार्थी रवींद्र वाघोडे हा गावाहून जळगावी येत असताना ममुराबाद ते म्हाळसा देवी मंदिर बोर्डापासून कचरा खदान दरम्यान दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याचा रास्ता अडवत खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी याप्रकरणी मोबाईल ट्रेसिंग करून वर्षभरापूर्वी चोरी गेलेल्या मोबाईलची माहिती काढून हवालदार संदीप साळवे, विजय शामराव पाटील, अविनाश देवरे यांचे पथक तयार केले होते. पथकाने राकेश गोकुळ राठोड रा.गणपती नगर याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने चोरलेला ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून दिला होता.

राठोडची अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा विक्की उर्फ माया गणेश शिंदे रा.कांचननगर याच्या साथीने केल्याची कबुली दिली आहे. राकेश गोकुळ राठोड याला पुढील चौकशीकामी त्याला तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :