⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगावात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२४ । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत एकाच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक ताब्यात घेतला आहे.

महाबळकडून जळगाव शहरात अनोळखी व्यक्ती हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडी २७५२) ने जात असतांना पाळधीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ७६४२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २५ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक ताब्यात घेतला आहे.

तर खासगी वाहनाने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही. नातेवाईकांनी ओळख पटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

दरम्यान, जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून त्यातून वाहने काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागतेय.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.