जळगावात भरधाव कंटेनरने पुन्हा वकीलाला चिरडले

मार्च 28, 2023 10:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी धरणगावच्या वकिलाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली असताना आणखी एका वकिलाचा चिरडले आहे. भरधाव कंटेनरने वकिलाच्या दुचाकीला धडक दिल्याची घटना काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात वकिलाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. योगेश जालमसिंग पाटील (रा. दादावाडी,जळगाव) असे मृत वकील यांचे नाव असून धडक देणार्‍या कंटेनरसह चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

New Project 2 jpg webp

चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील रहिवाशी असलेले योगेश पाटील हे जळगावातील दादावाडीत वास्तव्यास होते जिल्हा न्यायालयात ते वकिली करत असत. योगेश पाटील हे सायंकाळी त्यांच्या शाहु महाराज कॉम्प्लेक्समधील कार्यालयात असताना रेल्वे स्थानकावर आलेल्या एका पक्षकाराचा त्यांना फोन आला. फोन वरील चर्चेनुसार ते पक्षकाराकडील कागदपत्र घेण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने (एमएच. १९. सीई.६५११) निघाले. परंतु कोर्ट चौकाडून रेल्वे स्थानकाकडे जात असताना सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास नेहरू चौकात त्यांच्या दुचाकीला रेल्वे स्थानकाकडून टॉवर चौकाकडून निघालेल्या भरधाव कंटेनरने धडक दिली.

या अपघातात अॅड. योगेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. केतन ढाकेंसह इतर वकील बंधुंनी जिल्हा रूग्णालय गाठले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now