---Advertisement---
जळगाव जिल्हा

हजारो शोकाकुलांनी दिला शहीद वीर जवान अर्जून बावस्कर यांना वरणगावात अखेराचा निरोप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । सैन्यदलाचा वीर जवान अर्जून बावस्करला दि २४ मार्च रोजी अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेखास्थित डोपावा येथे कर्तव्य बजावीत असताना विरमरण आले होते. आज दि २७ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो शोकाकुल नागरिकांनी ‘वीर जवान अमर रहे’ घोषणा देत अखेरचा निरोप देत त्यांच्या दोघा मुलांनी अग्नी डाग देऊन शासकिय इतमात अंतिम संस्कार करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष भेटून कुटुंबाचे सांत्वन केले.

Arjun Bawaskar

सिध्देश्वर नगर परिसरातील सम्राट नगर मधील व भारतीय सैन्य दलातील जवान अर्जून लक्ष्मण बावस्कर (३५) यांना अरुणाचल प्रदेशात धोपावा या ठिकाणी कर्तव्यावर विरमरण आले होते. लष्करी प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर त्यांचे पार्थिवदेह छत्रपती संभाजीनगर येथे आज गुरुवार दि २७ मार्च रोजी सकाळी लष्करी वाहनाने घरी आणण्यात आले. त्यावेळी सोबत 10 महार रेजिमेंटचे सुभेदार जरनेल सिंग होते.तसेच संभाजीनगर वरून 97 आर्टिलरी ब्रिगेडचे लेफ्टनंट अमित शहा आलेले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांच्या अंतिमयात्रेसाठी हार व फुलांनी सजविण्यात आलेल्या वाहनात तिरंग्यात चिरनिद्रेत ठेवून अंत्ययात्रा निघाली. सिध्देश्वर नगर , वामन नगर , बस स्थानक चौक , प्रतिभा नगर मार्गे जात असताना ‘वीर जवान अमर रहे , भारत माता की जय ‘ अशा घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी बस स्थानक चौकातील तिरंगा ध्वजा जवळ मानवंदना देण्यात आली होती.

---Advertisement---

उप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिम यांत्रा पोहचल्या नंतर वीर जवनाला लष्कर , पोलीस प्रशासन , जिल्हा प्रशासन , विविध राजकिय पक्ष , सामाजिक संघटना , नगर परिषद प्रशासन ,माजी नगर सेवेक , पंचक्रोशीतील माजी सैनिक व नागरिकांनी पुष्पचक्र अपर्ण करीत श्रद्धांजली वाहिली. लष्करी जवानांनी व पोलीस प्रशासनाने हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. त्यांच्या पार्थीव देहावर शासकीय अंतिम संस्कार करताना त्यांच्या दोन्ही मुलांनी अग्नी डाग दिला.

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेटून सांत्वन केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश प्रकाश पाटील, उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील , मुख्याधिकारी सचिन राऊत , सह पोलीस निरिक्षक जनार्धन खंडेराव, एस सिद्धीचे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक परिवार यांची उपस्थिती होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment