लाडक्या बहिणींसाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वितरित ; लवकरच ऑगस्टचा हप्ता जमा होणार

सप्टेंबर 10, 2025 7:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२५ । लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. सप्टेंबरमध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी चर्चा होती, पण सरकारने आता ऑगस्टचा निधी स्वतंत्रपणे जारी केला आहे.

ladki bahin yojan

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात २ कोटी ४८ लाख लाभार्थी आहेत. आतापर्यंत जुलै २०२५ महिन्यापर्यंतचे दीड हजार रुपये लाभ महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, ऐन गणेशोत्सवात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवर पडल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन नऊ दिवस झाले तरी पैसे अद्याप खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ कधी जमा होणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली होती.

महिला बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच जमा होईल असे आश्वासन दिले होते. मात्र सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय जारी करीत चालू आर्थिक वर्ष २०२५- २६ मध्ये या योजनेसाठी एकूण ३९६० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now