जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली असून या योजनेद्वारे दरमहिन्याला १५०० म्हणजे वर्षाला १८००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत ३ महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अॅडव्हान्स दिला जाणार आहे.१० ऑक्टोबरपूर्वी म्हणजेच दिवाळीपूर्वी महिलांना ३००० दिले जाणार आहेत. या योजनेत काही महिलांच्या खात्यात ५ महिन्याचे ७५०० रुपये आले आहेत तर काही महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही. तर तुमच्या अकाउंटला पैसे आलेत की नाही हे चेक करण्याची सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमचा अर्ज अप्रुव झाला आहे परंतु तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड सिडिंग नसेल तर पैसे जमा होण्यास अडचणी येतात. त्यामुळेच तुम्ही तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड सिडिंग आहे का हे चेक करा.अनेक महिलांचे एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत. त्यामुळे ज्या खात्यात तुमचे आधार कार्ड आणि अकाउंट सिडिंग आहे त्या खात्यात थेट पैसे जमा होतात. अशावेळी महिलांना मेसेज येत नाही. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे कसं चेक करायचं ते जाणून घ्या.
बँकेत पैसे जमा झालेत की नाही असं चेक करा
सर्वप्रथम तुम्ही तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड सिडिंग आहे का हे चेक करा.
त्यासाठी https://uidai.gov.in/en/ या वेबसाइटला भेट द्या.
या वेबसाइटवर My Aadhar वर क्लिक करा.
त्यानंतर Aadhar Services मध्ये जाऊन बँक सिडिंग स्टेट्सवर क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर लॉग इन ऑप्शन तुम्हाला दिसेल.
यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
यानंतर तुम्हाला Bank Seeding Status वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल,
या मेसेजमध्ये तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक झाले असल्याची माहिती असेल. त्यानंतर तिथेच दिलेल्या बँक अकाउंटवर तुमचे पैसे आले असतील.