राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! या महिन्यात 1500 नाही 3000 खात्यात जमा होणार?

डिसेंबर 5, 2025 4:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२५ । डिसेंबर महिन्याची सुरुवात झाला पण लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये कधी मिळणार? याकडे लक्ष लागले आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे

ladki bahin

सरकार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट आताच देण्याची शक्यता आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होतील. यावेळी नोव्हेंबर आणि डिसेबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होणार आहे. असे झाले तर लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार 3000 रुपये जमा करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

लाडकी बहिणींच्या बँक खात्यात पैसे न आल्यामागे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असू शकते. यामुळेच बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. यापूर्वी गेल्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात एकाचवेळी दोन महिन्यांची रक्कम जमा झाली होती. त्यावेळी महिलांना एकदाच 3,000 रुपये मिलाले होते. एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now