लाडक्या बहिणींना ‘बंपर लॉटरी’! खात्यात जमा होणार ४,५०० रुपये ? आज मोठा निर्णय होण्याची शक्यता

मे 12, 2026 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मार्च, एप्रिल आणि चालू मे महिना उजाडला तरी महिलांना दोन महिन्यांपूर्वीचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचे हप्ते गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहेत. दरम्यान, हा थकीत हप्ता याच आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ladki bahin

आज दुपारी होणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. निधी मंजूर झाल्यानंतर थेट डीबीटी (DBT) द्वारे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांचा लाभ दिला जातो. त्यामुळे आता महिलांना फक्त मार्च महिन्याचे १५०० रुपये मिळणार की मार्च आणि एप्रिलचे मिळून ३००० रुपये एकत्र जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही लाभार्थी महिलांना मे महिन्याचाही हप्ता मिळून एकूण ४५०० रुपये मिळतील का, याबाबतही उत्सुकता आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

६६ लाख अपात्र महिला बाद!

योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ई-केवायसी (e-KYC) आणि आधार पडताळणीची प्रक्रिया अनिवार्य केली होती. या सखोल तपासणीनंतर सरकारने मोठी कारवाई केली असून, राज्यातील तब्बल ६६ लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. या कडक प्रक्रियेमुळे योजनेतील पैशांची होणारी गळती रोखण्यात सरकारला मोठे यश आले आहे.ज्या महिलांनी अजूनही आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो महिला या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. केवळ १ कोटी ७७ लाख पात्र महिलांनाच आता या योजनेचा पुढील लाभ मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now