लाडक्या बहिणींच्या खात्यात जूनचा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

जून 22, 2025 10:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुने २०२५ । जून महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. मात्र अद्यापही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जून महिन्याचे १५०० रुपये जमा झाले नाहीय. जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहेत. दरम्यान, पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

ladki bahin yojan

पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याचसोबत लाडक्या बहि‍णींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरु करण्यात येणार आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की, सरकार लवकरच नवीन योजना सुरु करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ४०,००० रुपयांपर्यंतचे बँक लोन देईल. यामधून महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करतील. याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

महिलांना कसं मिळणार लोन?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत.
लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेससंबंधित माहिती द्यावी लागणार आहे.
महिलांना जे १५०० रुपये मिळतात. त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहे. जेणेकरुन महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment