लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जुलै महिन्याचे 1500 रुपये खात्यात जमा होणार, पण कधी?

जुलै 23, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२५ । राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना राबविली जात असून या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याचे १५०० रुपये थेट खात्यात जमा केले जात आहे. जूनपर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले असून मात्र अद्याप लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा झाले नाहीय.

ladki bahin yojan

जुलैच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, येत्या ८ दिवसांतच महिलांच्या खात्यात जुलैचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत हे पैसे दिले जाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

जुलै महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे या दिवसात कधीही खात्यात पैसे जमा होतील. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता लांबणीवर जात आहे किंवा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जातो. त्यामुळे यावेळीही या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातील, असं सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना राबवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत २ कोटींपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होत आहे. त्यातून अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत.

१० लाख महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजनेत जवळपास १० लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहेत. त्यानंतर आता निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केल्यानंतर आता नवीन यादी तयार करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाला देण्यात आले आहेत. त्यानंतर यादी तयार केली जाईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now