जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२५ । जुलै महिना संपूर्ण ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली. मात्र अद्याप लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्यातील हप्त्याचे १५०० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीय. जुलैचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहीण करीत आहे. मात्र यातच लाडक्या बहिणींसाठी एक गुडन्यूज असून जुलैच्या हप्त्याबाबत सरकारने घोषणा केली आहे.

लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे.त्यामुळे आता महिलांच्या जुलैच्या हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे.९ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे.

आदिती तटकरेंची पोस्ट?
आदिती तटकरेंची एक्स या अकाउंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट.माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे.रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता 8 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.दरम्यान, लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. फक्त जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येईल, असं सांगितलं आहे. त्यामुळे त्यानंतर ऑगस्टचा हप्ता दिला जाईल.












