लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली; फेब्रुवारीचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात..

मार्च 27, 2026 3:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहे. लाडकी बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे १५०० पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स अकाऊंटवरून ट्वीट करत माहिती दिली आहे.

ladki bahin

त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले की , ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.’

मार्च महिना संपत आला तरी अद्यापही फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा न झाल्यानं लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम वाढला होता. जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे २३ फेब्रुवारीला देण्यात आला होता. त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष फेब्रुवारीचा हफ्ता कधी येणार याकडे लागले होते.

मात्र सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वितरित करण्यासाठी २२७ कोटी रुपये महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता दिली. त्यानंतर आता लाडकींच्या खात्यावर १५०० रुपये जमा होण्यास आजपासून सुरूवात झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now