लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नोव्हेंबर 18, 2025 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२५ । लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी एक बातमी आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र ई-केवायसी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

ladki bahin yojan

लाडकी बहीण योजनेचा अपात्र महिलांनी देखील लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याचा दि. १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होता. आता त्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश, याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now