जळगावात पाचव्या मजल्यावरून कोसळून तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू

एप्रिल 14, 2026 11:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, मास्टर कॉलनीतील शेरा चौकात बांधकाम करताना तोल गेल्याने पाचव्या मजल्यावरून कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. मुकेश गोकुळ सोनार (३२) असे या मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सोनार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

mukesh sonar

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी (१३ एप्रिल) सायंकाळी मुकेश सोनार हे पाचव्या मजल्यावर काम करत होते. दरम्यान, बांधकामाचा काही भाग अचानक धसल्याने त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली कोसळले.

मुकेश खाली पडताच परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर घटनास्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे समोर येत आहे. “काम सुरू असताना मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध होती का?” असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now