---Advertisement---
नोकरी संधी

महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; ८१,१०० पगार मिळणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठात भरतीची जाहिरात निघाली आहे. कृषी विद्यापीठातील गट क संवर्गात भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. Krushi Vidyapeeth Recruitment 2025

job jpg webp webp

कृषी विद्यापीठात सध्या कृषी सहाय्यक आणि इतर पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ही अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. १० एप्रिल २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. Krushi Vidyapeeth Bharti 2025

---Advertisement---

पदाचे नाव आणि पात्रता?
कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी पदवीधर आणि संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. कृषी विद्यापीठात ७१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

किती पगार मिळेल?
कृषी सहाय्यक पदासाठी २५,५०० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यकतेनुसार आणि अनुभवानुसार वेतन दिले जाणार आहे.

वयोमर्यादा आणि परीक्षा फी :
१८ पेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. चांगल्या विद्यापीठात पर्मनंट नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ही भरती करण्यात येणार आहे. १० एप्रिल २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment