प्रवाशांसाठी खुशखबर..! भुसावळ रेल्वे स्थानकांवर या गाडीला मिळाला थांबा

एप्रिल 2, 2023 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२३ । भुसावळ रेल्वे स्टेशनवरून दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नांदेड ते हजरत निझामुद्दीन दिल्ली संपर्क क्रांती एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

train 2

नांदेड ते निजामुद्दीन (गाडी क्र.१२७५३) व निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र.१२७५४) संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाडीला आजवर जळगाव रेल्वे स्थानकाला थांबा होता. जळगाववरून सुटल्यानंतर ही गाडी थेट भोपाळ स्टेशनला थांबते. ही रेल्वे गाडी भुसावळला थांबत नव्हती. मात्र ही गाडी आता ४ एप्रिल २०२३ पासून भुसावळ स्टेशनवर थांबणार आहे.

नांदेड ते हजरत निझामुद्दीन दिल्ली संपर्क क्रांती एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. ही गाडी आता दिल्लीला जातांना तसंच येतांना भुसावळ स्थानकावर पाच मिनिटं थांबणार आहे. यामळे भुसावळसह परिसरातील प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now