१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले; गुन्हा नोंद

एप्रिल 12, 2022 2:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime (1)

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी रात्री ११ ते मध्यरात्री १.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेल्याचे पीडितेच्या कुटुंबियांना लक्षात आले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात तपास केला परंतु, मुलगी कुठेही मिळून आली नाही. याबाबत पीडितेच्या आईने वरणगाव पोलीसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार नरसिंग चव्हाण करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now