⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Khadse Biodata : जाणून घ्या, एकनाथराव खडसेंचा संक्षिप्त जीवन परिचय

जळगाव लाईव्ह न्यूज । Khadse Biodata । राज्याचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. एकनाथराव खडसेंच्या जीवनाची सुरुवात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या लहानश्या गावातून झाली असून त्यांनी अनेक पदांवर जबाबदारी पार पाडली आहे. जाणून घेऊ खडसेंचा संक्षिप्त जीवन परिचय..

एकनाथराव खडसे वैयक्तिक परिचय
नांव – एकनाथराव गणपतराव खडसे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
जन्मतारीख – २ सप्टेंबर १९५२
पत्ता – मु.पो. कोथळी, ता. मुक्ताईगर, जि. जळगाव (पीन ४२५३०६)
शिक्षण – बी.कॉम. (अतीम वर्ष)
व्यवसाय – शेती


शैक्षणिक कारकिर्द –

  • सिनेट सदस्य – पुणे विद्यापीठ – व्यवस्थापन परिषद सदस्य – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर (१९९९ ते २००९)
    संस्थात्मक कारकिर्द
    शिक्षण क्षेत्र – . संचालक – मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी (१९८२ ते २००९) – सेक्रेटरी – मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी (१९८५ ते १९९४) संचालक – मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ, मुक्ताईनगर
    सहकार क्षेत्र – – संचालक – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव
    _ (१९९७ ते २०२०) – मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक चेअरमन – आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणी लि., मुक्ताईनगर (१९९५ ते ९६) – चेअरमन – मुक्ताईनगर सहकारी पिक संरक्षण संस्था लि. – चेअरमन तथा संचालक – मुक्ताईनगर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि., मुक्ताईनगर (१९८२ ते १९९६) संस्थात्मक कारकिर्द
    सहकार क्षेत्र –
  • संचालक – बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती (१९९० ते १९९५) – संचालक – भुसावळ पिपल्स को-ऑप. बँक लि. भुसावळ (१९८५ ते ९०) – चेअरमन – मुक्ताई सहकारी तेलबिया संस्था लि., मुक्ताईनगर – संस्थापक चेअरमन – मुक्ताई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लि.
    सार्वजनिक कारकिर्द –
    सरपंच – ग्रामपंचायत कोथळी, ता. मुक्ताईनगर (१९८४ ते १९८७)
  • सदस्य – पंचायत समिती, मुक्ताईनगर (१९८२ ते १९९०) – सदस्य – महाराष्ट्र राज्य विधानसभा, मुबई (१९९० ते २०१९) – विरोधीपक्ष नेता – महाराष्ट्र राज्य विधानभा, मुंबई (२००९ ते २०१४) – मंत्री – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य (१९९५)
  • अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य (१९९५ ते ९७) – पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास मंत्री महाराष्ट्र राज्य (१९९७ ते १९९९) – महसुल, मदत व पुर्नवसन, कृषी, फलोत्पादन, अल्पसंख्यांक विकास, मत्स्य व्यवसाय, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य (२०१४ ते २०१६) – पालकमंत्री, जळगाव आणि बुलढाणा जिल्हा (२०१४ ते २०१६)
    पक्षीय कारकिर्द ।
    उपाध्यक्ष – मुक्ताईनगर तालुका भाजपा
  • अध्यक्ष – जळगाव जिल्हा भाजपा (१९९२ ते ९५) – सरचिटणीस – महाराष्ट्र प्रदेश भाजपा (१९९९ ते २००४) । मुख्य प्रतोद – भाजपा विधीमंडळ पक्ष, महाराष्ट्र राज्य (१९९० ते १९९५) – उपनेता – भाजपा विधीमंडळ पक्ष, महाराष्ट्र राज्य (२००० ते २००४) – गटनेता – भाजपा विधीमंडळ पक्ष, महाराष्ट्र राज्य (२००४ ते २००९) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश (सन ऑक्टोबर २०२०)
    सततच्या अभ्यासाचे विषय –
    कृषी क्षेत्राशी संबंधीत नवनवीन तंत्रज्ञान अवगत करुन प्रयोग करणे.
    .. राज्यातील सिंचनातील अनुशेष, सिंचन क्षेत्राचा व सद्यस्थितीचा अभ्यास.

एकनाथराव खडसेंचा संक्षिप्त जीवन परिचय

  1. एकनाथराव खडसेंचा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावी २ सप्टेंबर १९५२ रोजी जन्म झाला.
  2. खडसेंचे वडील शेतकरी होते. कोथळी गावातच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.
  3. सामाजिक कार्याची आवड असल्याने तरुणपणीच खडसे राजकारणात सक्रीय होते.
  4. १९८७ मध्ये खडसे कोथळी गावचे सरपंच म्हणून पहिल्यांदा निवडून आले.
  5. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
  6. सलग सहा वेळा खडसे मुक्ताईनगरातून विधानसभेवर निवडून गेले.
  7. १९९५ मध्ये युती सरकार आल्यानंतर खडसेंनी अर्थ आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम पहिले.
  8. २००९ मध्ये युती सरकार विरोधात गेल्यावर खडसेंनी विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले.
  9. २०१४ ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.
  10. मुख्यमंत्री पद न मिळाले नसले तरी खडसेंकडे १२ मंत्रीपदाची जबाबदारी होती.
  11. आरोप झाल्याने जून २०१६ मध्ये खडसेंना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  12. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडसेंना भाजपने तिकीट नाकारले.
  13. ८ मे २०२० रोजी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत देखील खडसेंना उमेदवारी देण्यात आली नाही.
  14. २१ ऑक्टोबर २०२० रोजी खडसेंनी भाजप सोडली.
  15. २३ ऑक्टोबर २०२० रोजी एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  16. २० जून २०२२ राजी एकनाथराव खडसे विधान परिषदेवर निवडून आले.