काथार क्रिकेट लीग स्पर्धा संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । मोनाली कामळस्कर फांऊंडेशनतर्फे गेल्या पाच वर्षापासून काधार वाणी समाजातील मुला-मुलींची क्रिकेट स्पर्धा अर्थात काथार क्रिकेट लीग घेण्यात येत असून यंदाही दि. १८, १९, २० फेब्रुवारी रोजी एकलव्य क्रिडा संकुलाच्या भव्य मैदानावर घेण्यात आल्या.
यंदा मुलांचे १० व मुलींचे 2 असे एकूण १२ संघ स्पर्धेत दाखल झाले होते. या संघामध्ये जळगांव परीसरासोबतच सिल्लोड, औरंगाबाद, वालचंदनगर, पुणे, मुंबई, सुरत येथील खेळाडू सहभागी झाले होते. दोन गटात साखळी पद्धतीने खेळविल्यात आलेल्या 20 सामन्यातुन ‘अ’ गटातून KK-11 व रथ चौक तर ‘ब’ गटातुन फ्रेंड क्रिकेट क्लब (FCC) व BJ काथार हे संघ उपांत्य फेरीत दाखल झाले होते.
पारीतोषिक वितरण समारंभास आ. राजुमामा भोळे, राधेश्याम व्यास, समाज अध्यक्ष विजय नारायण वाणी, संस्थापक नंदकिशोर कामळस्कर, अध्यक्ष सुधाकर वाणी, सचिव वासुदेव वाणी, युवाचे संस्थापक योगेश वाणी, युवा अध्यक्ष राजेश वाणी, शंकर वाणी, क्वालिटी बुक्सचे गणेश डाळवाले, सलोनी एजन्सिजचे मनिष वाणी, अजित वाणी, प्रमोद वाणी, निलेश प्रकाश, वनिताताई बोरसे, किशोर परनाळे, नितीन वाणी हे उपस्थित होते.
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन प्रकल्प प्रमुख अजय कामळस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल हरणे, अनंत कश्यप, भूषण हरणे, योगेश वाणी, जितेंद्र वाणी, योगेश वाणी, रोहीत कामळस्कर, चंद्रकांत असोदेकर, अभिलाष कामळस्कर, रामप्रसाद वाणी, भूषण चंद्रकांत, श्रीकृष्ण बाविस्कर, हितेश वाणी, मनोज वाणी, प्रशांत वाणी (बंटी), अजित बाविस्कर, पियुष वाणी, महेंद्र वाणी, हर्षल वाणी व आदित्य कामळस्कर यांनी परिश्रम घेतले.
यांचे सहकार्य
वसंतराव बाविस्कर, अध्यक्ष विजय वाणी, मुकेश वाणी, वासुदेव वाणी, शंकर वाणी, भालचंद्र वाणी, संगिता चंदनकर (कासोदा), कल्पना सुमंत, सुमंत पंडीत (पुणे), अजित वाणी, नितीन नामदेव, रविंद्र वाणी, प्रो. सुशिल चंदनकर, विनोद वाणी (अंबरनाथ), मनिष वाणी (ठाणे), प्रमोद वाणी (असोदा), मनिष वाणी, गणेश डाळवाले, सुरेश वाणी, निलेश वाणी (पिंप्राळा), कर सल्लागार तुषार हरणे (असोदा), हरेश्र्वर वाणी, हर्षल कामळस्कर, कु. प्रथमेश बोरसे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल
- जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल
- जळगावात ढगाळ वातावरणासह गारठा कायम; आगामी दिवस वातावरण कसे राहणार?