⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

अखेर रावेरमधून श्रीराम पाटीलांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर

जळगाव न्यूज | 10 एप्रिल 2024 | लोकसभा निवडणुका आता अगदीच जवळ आल्या असून जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या शरस पवार गटाकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरु होता. अखेर हा शोध संपला असून रावेरमधून उद्योजक श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

विशेष श्रीराम पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. मात्र रावेरमधून भाजपाने रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी दिली. यातच श्रीराम पाटील यांनी रावेरमधून शरद पवार गटाला उमेदवारीची मागणी केली होती. दोन दिवसापूर्वी श्रीराम पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.

अखेर आज शरद पवार गटाकडून सातारा सह रावेरच्या उमेदवाराची घोषणा केली. त्यात श्रीराम पाटील यांना रावेरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना रंगणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्याकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु होत्या. पण खडसेंनी नकार दिला. त्यातच त्यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवारांकडून इच्छूक उमेदवारांची चाचपणी कऱण्यात येत आहे. रवींद्र पाटील आणि श्रीराम पाटील यांची नावं आघाडीवर होती. अखेर आज श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.