⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

खुशखबर! मुंबई, पुण्यासाठी तीन विशेष एक्स्प्रेस ; भुसावळसह जळगाव स्थानकावर थांबा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२४ । उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने तीन उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे जळगावसह भुसावळच्या प्रवाशांची सोय झाली आहे. विशेष रेल्वेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मऊ, पुणे ते दानापूर व नागपूर ते पुणे या तीन गाड्यांचा समावेश आहे.

रेल्वे क्रमांक ०१०७९ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मऊ विशेष या रेल्वेच्या चार फेऱ्या होणार आहे. १० एप्रिल आणि १ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.३५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी ११.१० वाजता पोहोचेल.

०१०८० विशेष रेल्वे १२ एप्रिल आणि ३ मे रोजी रोजी मऊ येथून १३.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. या गाडीला जळगाव, भुसावळ थांबा आहे. पुणे ते दानापूर रेल्वेच्या ८ फेऱ्या होणार आहेत. ०१४७१ विशेष गाडी ११, १४ एप्रिल आणि २, ५ मे रोजी पुणे येथून ६.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचणार आहे