⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | कै. सुवर्णाताई देशमुख उद्यान सुशोभीकरण करा

कै. सुवर्णाताई देशमुख उद्यान सुशोभीकरण करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । चाळीसगाव शहरातील बस स्टँड दत्त मंदिरासमोर असलेले कै.सुवर्णाताई देशमुख उद्यानाचे नगरपरिषदेच्या वतीने सुशोभीकरण करावे अशी मागणी रयत सेनेच्या वतीने न पा उपमुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शहरात कै.सुवर्णाताई देशमुख हे एकमेव उद्यान आहे. या व्यतिरिक्त चाळीसगाव शहरात कुठलाही बगीचा अथवा उद्यान नसल्याने शहरातील बालगोपाळाना खेळण्यासाठी व वयोवृद्ध नागरिकांना मनाची शांतता लाभण्यासाठी हे उद्यान एकमेव असल्याने उद्यानअद्यावत करून सुशोभीकरण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात यावे तेथे नगरपरिषदे मार्फत कुठलीही देखभाल अथवा दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या हौशी नागरीकांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे .म्हणून या उद्यानात विविध प्रकारची फुलांचे झाडे त्यावर कटींग प्रोसेस जे की मनाला मोहन टाकतील असा पुणे ,नासिक या धर्तीवर बगीचा सुशोभीकरण करून तयार करण्यात यावा . त्यामुळे नागरिक येथे आकर्षित होऊन काही वेळ रममाण होतील व आपले दुःख विसरतील . बालगोपाळांना मनोरंजनाचे व खेळण्याचे विविध साहित्य बसवून त्यांना खेळण्याची सोय करून द्यावी. तसेच रात्रीच्या वेळेस काही ठिकाणी लाईट बंद असतात, त्यांची तात्काळ दुरुस्ती करून उद्यान प्रकाशमान करावे .जॉगिंग ट्रॅक, महिलांच्या व्यायामाचे साहित्य व मुलांचे पाळणे हे वारंवार खराब स्थितीत आहे ते दुरुस्त करून त्यात अजून खेळाचे साहित्य वाढ करण्याकडे नगर परिषदेने लक्ष दयावे .उद्यानात फिरावयास आलेली लहान बालके ‘ मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा गार्ड नेमावेत. बगीचा सुशोभीकरण करून शहराच्या लौकिकात भर घालावी तसेच स्टेशन रोड ते तहसील कार्यालयापर्यंत रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकांचे नूतनीकरण करून त्या दुभाजकांमध्ये शोभणारी रोपे लावण्यात यावी तसेच शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भगवा ध्वज उभारण्यात यावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी तात्काळ लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ पवार, प्रदेश कार्याध्यक्ष विजय पप्पू पाटील, प्रदेश सहसंघटक ज्ञानेश्वर भाऊ कोल्हे,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शहर संघटक दिपक देशमुख,शहर उपाध्यक्ष वैद्यकीय आत्माराम राठोड, मंगेश देठे, हर्षल रावते, शुभम पाटील, प्रशांत पाटील, किशोर दुशिंग, राजीव जाट ,आधार महाले, चंद्रशेखर पाटील, नाना पाटील ,जीवन पाटील ,भूषण चव्हाण यांच्यासह रयत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह