---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावच्या कादंबरी चौधरीच्या चित्रांचे मुंबईच्या ओबेराय हॉटेलमध्ये प्रदर्शन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२२ । कादंबरी सुधीर चौधरी एकदा नव्याने तिच्या नवीन कलेक्शन सोबत परत आलीये. प्रत्येक कला रसिकाच्या चित्ताला स्पर्श करतील अशा कलाकृति अणि नाविन्यपूर्ण चित्रे, कादंबरी “चित्त स्पर्श” च्या माध्यमातून परत येणार आहे. तिने रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाला दिनांक 24 डिसेंबर पासून हॉटेल ओबेरॉय, नरिमन पॉइंट, मुंबई येथे सुरुवात होणार आहे.

kadambari chaudhari jpg webp webp

प्रदर्शनाचे उद्घाटन आईपीएस कृष्ण प्रकाश नागर, उदय निरगुडकर, फ़िल्म डाइरेक्टर अक्षय ईंदिकर, असिस्टंट एडिटर मनोज भोयर अणि यूथ मेंटोर मनोज गोविंदकर यांच्या उपस्थितीत होणार असून प्रसिद्ध जैन इरिगेशन चे संचालक अशोक भाऊ जैन यांनी या प्रदर्शनास प्रायोजकत्व दिले आहे…कादंबरी ला मराठी ऐक्टर्स अणि बर्‍याच लोकांकडून प्रदर्शनासाठी खूप शुभेच्छा ही मिळाल्या आहेत.

---Advertisement---

दरम्यान, कोरोना काळातील लॉकडाऊन व त्या नंतर जे जे कॉलेज ऑफ आर्ट्स मधून चित्रकलेचे शिक्षण संपादन केल्या नंतर चा तिचा हा पहिलाच वैयक्तिकरीत्या केलेला चित्र प्रदर्शनाचा प्रयत्न आहे.

कादंबरी ला लहानपणापासून चित्रकलेची प्रचंड आवड आहे, आतापर्यंत तिने विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला असून तिला अनेक पारितोषिके ही मिळाली आहेत…कादंबरी ही एक सॉफ्टवेअर डेवलपर असून जे जे स्कूल ऑफ आर्ट ची विद्यार्थिनी आहे.

विशेष म्हणजे तिने रेखाटलेल्या चित्रांना परदेशातही मागणी असून आतापर्यंत होंग-कोंग, दुबई व पेरिस येथे तिने चित्रे पाठवली आहेत.तिच्या प्रत्येक चित्रात एक विशिष्ट भाव अणि गूढता दिसून येते.

कला रसिकांसाठी सदर “चित्त स्पर्श” प्रदर्शन दिनांक 24 डिसेंबर सकाळी 11 वाजेपासून तर दिनांक 30 डिसेंबर सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुले असणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---