थोरगव्हाणच्या प्रभारी‎ सरपंचपदी ज्योती पाटील‎

फेब्रुवारी 18, 2022 9:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । यावल‎ तालुक्यातील थोरगव्हाण ग्रामपंचायतीच्या‎ प्रभारी सरपंच पदी ज्योती केवल पाटील‎ ‎यांची निवड करण्यात‎ ‎आली आहे. ‎ ‎

j. patil jpg webp

जातीचे वैधता‎ ‎प्रमाणपत्र वेळेत सादर न‎ केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी थोरगव्हाणचे‎ लोकनियुक्त सरपंच उमेश सोनवणे यांना‎ अपात्र केले आहे. तेव्हापासून येथील सरपंच‎ पद रिक्त होते. या रिक्त जागेवर उपसरपंच‎ ज्योती पाटील यांची प्रभारी सरपंचपदी निवड‎ करण्यात आली. ग्रामसेविका कविता‎ बाविस्कर यांनी सभेला सुरुवात करुन‎ अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले.‎ ग्रामपंचायत सदस्य गोपाल चौधरी, हिरालाल‎ चौधरी, अनिल भालेराव, पद्माबाई पाटील,‎ मनोहर पाटील, सिद्धुबाई पाटील, यशोदाबाई‎ भालेराव, मथुराबाई पाटील उपस्थित होते.‎

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now