न्यायाधीशांना धमक्या दिल्या जात आहेत – संजय राऊत

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मार्च २०२२ : सध्या न्यायव्यवस्था खिश्यात टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू, देशात अजून असे काही न्यायाधीश आहेत की जे सरकारच्या दबावाखाली येत नाहीत, मात्र त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.

5 मार्चला खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली त्यामध्ये सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. कोकणातील जनता उद्धव ठाकरेंच्या मागे असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आता कोणीही सभा घेतली तरी फरक पडत नसल्याचे राऊत म्हणाले.

न्याव्यवस्थेला धमकी देणारं सरकार यालाच हुकूमशाहीचं सरकार म्हणतात अशी टीका संजय राऊतांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हुकूमशाही विरोधात लंडनमध्ये आवाज उठवला आहे, म्हणून राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे राऊत म्हणाले.