⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जळगाव राष्ट्रवादीतर्फे ‘जोडे मारो’

आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जळगाव राष्ट्रवादीतर्फे ‘जोडे मारो’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २० सप्टेंबर २०२३ | भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने निषेध केला. आकाशवाणी चौकात जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येऊन आमदार पडळकर यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी स्वत:च्याच सरकारला पत्र पाठवलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच त्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. यावेळी, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले. तसेच, पडळकरांनी अजित पवारांचं नाव घेत, हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याची घणाघाती टीका केली. तसेच खासदार सुप्रिया सुळे धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले असता पडळकर यांनी त्यांच्यावरही टीका केल्याने राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे.

जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, महिला अध्यक्षा मंगला पाटील, वाल्मीक पाटील, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, महानगर जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, किरण राजपूत, रहिम तडवी, अकिलभाई पटेल, राजा मिर्झा, सबाज तडवी, अकील खान, चेतन पवार, हितेश जावळे, आकाश हिवाळे, खलील शेख, प्रमोद पाटील, विनोद धमाले, मयूर पाटील, गणेश सोनार, नईम खाटीक, राहुल टोके, बशीरभाई शाह, सुहास चौधरी, संजय चव्हाण, आप्पा मराठे, मुश्‍ताक खाटीक, वाहबभाई खाटीक, मंजूर पटेल, हेमंत खैरनार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह