⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

प्रा.लिलाधर पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१ । उत्तर महाराष्ट्रस्तरिय पुरस्कार सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात पंधरा वर्षांपासून वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाबद्दल प्रा. लिलाधर पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. तसेच हा सोहळा महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे आयोजित करण्यात आला होता. असे शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रेमचंद आहिरराव यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती 

जळगावचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रा.लिलाधर पाटील यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मंचावर शिक्षक परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रभाकर झोड, जळगावचे तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी हे प्रमुख अतिथी म्हणून तर अध्यक्ष म्हणून नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष हेमंतकुमार साळुंखे उपस्थित होते.

प्रा.लिलाधर पाटील यांना मिळालेल्या गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, एन.मूकटो. प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा.किशोर पाटील व सर्व पदाधिकारी यांनी धनदाई महाविद्यालयात त्यांचा सत्कार केला तर संस्थेचे अध्यक्ष डी.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रा. के.डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, नागरी हित दक्षता समितीचे प्रा.अशोक पवार, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांचेसह समाजाच्या विविध स्तरातून मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.